नामपूर- मराठी नववर्षारंभ अर्थात, गुढीपाडवा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात वाहन, गृह, आणि सोने खरेदीला प्राधान्य देतात. परंतु यंदा नागरिकांनी आपल्या मनपसंत वाहन खरेदीला प्रथम पसंती दिल्याने कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळाल्याने शासनाचे परिवहन खाते मालामाल झाले आहे.