सातपूर- अंबड इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या बुधवारी (ता. ९) झालेल्या बैठकीत घंटागाडी आणि वाहतूक समस्येबाबत जोरदार चर्चा झाली. घंटागाड्यांची अनियमितता, कर्मचाऱ्यांची अरेरावी आणि पैशाची होत असलेली मागणी यावरून उद्योजकांनी वॉटर ग्रेसचे पर्यवेक्षक विजय जमदाडे यांना जोरदार धारेवर धरले. आठ दिवसांत सर्व मुद्द्यांचा सोक्षमोक्ष लावला जाईल, असे आश्वासन जमदाडे यांनी या वेळी दिले.