निखिल रोकडे : नाशिक- मुंबई- आग्रा महामार्गावरील ओझर दहावा मैल येथे एक किलोमीटरचा उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे २० मिनिटांहून कमी वेळेत नाशिक एअरपोर्टला पोहोचणे शक्य होईल. मुंबई-आग्रा महामार्गावर होणाऱ्या नेहमीच्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून ‘एनएचआय’ने ओझर दहावा मैल व खडकजांब येथे प्रत्येकी एक किलोमीटरचे उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले आहे.