Tree Plantation : सिन्नर-शिर्डी महामार्गावरून प्रवास होणार सुखद! 25 हजार फुलझाडे घालणार सौंदर्यात भर

सिन्नर-शिर्डी महामार्गावरून भाविकांसह प्रवाशांचा प्रवास सुखद होणार आहे.
Trees planted on Sinner-Shirdi highway
Trees planted on Sinner-Shirdi highwayesakal

Nashik News : सिन्नर-शिर्डी महामार्गावरून भाविकांसह प्रवाशांचा प्रवास सुखद होणार आहे. त्यासाठी महामार्ग दुभाजकांच्या मधोमध विविधरंगी २५ हजार फुलझाडे आणि मुख्य रस्त्यासह पालखी मार्गालगत सावली देणाऱ्या मोठ्या पंधरा हजार रोपांची लागवड करण्यात आली आहे. (Traveling on Sinnar Shirdi highway will be pleasant 25 thousand flowers will added to beauty nashik news)

नाशिक-पुणे महामार्गावरील गोरेवाडी फाटा येथून सुरू होणाऱ्या सिन्नर-शिर्डी महामार्गाला लागून मुसळगाव औद्योगिक वसाहतीपासून साईभक्तांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्ररीत्या बनवण्यात आलेल्या ४० किलोमीटरच्या पालखी मार्गालगत सहा मीटरवर एक अशी साडेचार हजार रोपांची लागवड करण्यात आली आहे.

तसेच मुख्य रस्त्याला लागून दहा हजार रोपांची लागवड करण्यात आली. शिवाय दुभाजकाच्या मधोमध लावलेली रंगीबेरंगी फुलझाडे महामार्ग हिरवागार आणि साईभक्तांना सुखावणारा ठरणार आहे. पर्यावरणपूरक असलेल्या पालखी मार्गावरील झाडांचे संगोपन झाल्यानंतर साईभक्तांना झाडांच्या सावलीत विसावा घेता येईल. त्याचबरोबर अनवाणी चालताना होणारा प्रवास आल्हाददायक होईल.

सिन्नर-शिर्डी या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात ५० किलोमीटरचा मुख्य महामार्ग, तर ४० किलोमीटरचा पालखी मार्ग बनवण्यात आला. मुख्य मार्गावरील दुभाजकात वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे लावण्यात आली आहेत.

याशिवाय सिन्नरहून शिर्डीकडे जाताना मुख्य रस्त्याच्या उजव्या बाजूने पिंपळ, वड, कडुनिंब, जांभूळ, कांचन, आकाश शेवगा या प्रकारातील रोपांचा समावेश आहे. हे काम अंतिम टप्प्यात आहे. पालखी मार्गालगत नावीन्यपूर्ण पद्धतीने वृक्षारोपण करण्यात आले आहे.

एकाच प्रकारातील रोप सलग एक किलोमीटरवर लावण्यात आली आहेत. आलटून-पालटून ही रोप लावण्यात आल्यामुळे महामार्गाच्या सुशोभीकरणात भर पडणार आहे. पुढची पंधरा वर्षे लागवड केलेल्या झाडांची सर्वतोपरी काळजी घेतली जाणार आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Trees planted on Sinner-Shirdi highway
Women Employment : गृह उद्योगातून 12 हजार महिलांना रोज रोजगार; पापड, शेवया, कुरडया बनवण्यास सुरवात

त्यामुळे सिन्नर-शिर्डी हा हरित महामार्ग म्हणून नावारूपाला येणार आहे. महामार्गावरील दुभाजकात लाल फुलांचे गनवेल, पिवळ्या फुलांचे कोमा, गुलाबी रंगाचा शिरीष आणि आकर्षक रंगाचा शंकासुर अशा वेगवेगळ्या रंगीबेरंगी फुलझाडांची लागवड करण्यात आली आहे.

वृक्षवल्ली आम्हां सोयरे

वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरें ।

पक्षी ही सुस्वरें आळविती ।।

येणे सुखे रुचे एकांताचा वास ।

संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. अर्थात, वृक्षवल्लीपासून आपल्याला खूप फायदे आहेत आणि वृक्षवल्ली आपले सगे-सोयरे आहेत, अशी शिकवण महाराज देतात. पशू-पक्षी विठ्ठलाचे नामस्मरण करत आहेत. आपले वनाशी खरे नाते आहे.

"हरित महामार्ग म्हणून विकसित होणारा सिन्नर-शिर्डी महामार्ग ‘हायब्रीड एन्यूटी मॉडेल्स’ (हॅम) पद्धतीने बांधण्यात आला आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी आणि दुभाजकांमध्ये लावण्यात आलेल्या झाडांची पुढची पंधरा वर्षे निगा राखली जाईल. त्यासाठी मोंन्टेकार्लो कंपनीकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाईल. तसेच झाडांच्या संगोपनासाठी कर्मचारी नेमले जातील."

- सुकांता साहू, प्रकल्प व्यवस्थापक, मोंन्टेकार्लो

Trees planted on Sinner-Shirdi highway
Jal Jeevan Mission : जलजीवन’चे सर्वच ठेकदार वाऱ्यावर; केंद्राचा 74 कोटी निधी गेला परत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com