Nashik News: आधीचीच वृक्षगणना अपुरी, त्यात नवीन गणनेचा घाट! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tree Census

Nashik News: आधीचीच वृक्षगणना अपुरी, त्यात नवीन गणनेचा घाट!

नाशिक : दर पाच वर्षांनी वृक्षगणना केली पाहिजे, असे वृक्ष संरक्षक कायद्यात म्हटले असताना बंधनकारक असल्याचे मानून व त्यातही यापूर्वी करण्यात आलेली वृक्षगणना अपुरी असताना नवीन वृक्ष गणना करण्याचा घाट उद्यान विभागाकडून घातला जात आहे.

२०१६ मध्ये महापालिकेने शहरातील वृक्षसंपदेची गणना करण्याचा निर्णय घेतला. वृक्ष गणनेसाठी मुंबई येथील टेरेकॉन कंपनीला सर्वेक्षणाचे काम देण्यात आले. (tree census Prepared by Parks Department based on rules Nashik News)

वृक्षगणना झाल्यानंतर त्यावर टॅग लावणे बंधनकारक करण्यात आले. महापालिकेत वृक्षगणना हा विषय मोठा वादग्रस्त ठरला. प्रतिवृक्ष गणनेची किंमत ठरविण्यापासून ते बिले अदा करण्यापर्यंत संपूर्ण प्रक्रिया वादग्रस्त ठरली. दोन वर्षानंतर म्हणजे २०१८ च्या अखेरीस वृक्षांची गणना पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला.

सर्वेक्षणातून प्राप्त झालेल्या अहवालानुसार ४९ लाख वृक्षांची गणना करण्यात आली. एकूण वृक्षामध्ये २१ लाख २४ हजार ११३ गिरीपुष्प जातीची झाडे आढळली. एकूण वृक्ष संपदेच्या एकूण ५७ टक्के हे प्रमाण आढळून आले.

त्या खालोखाल सुबाभूळ, निलगिरी, अशोका व गुलमोहर, बाभूळ, आंबा, बोर, बटरफ्लाय पाल्म, चंदन, कडुनिंब, करंजी, कांचन, नारळ, निलगिरी, सिल्वर ओक, सिसम, विलायची चिंच याप्रमाणे झाडांचे प्रमाण आढळून आले. वृक्षांची गणना होऊन अद्यापपर्यंत पाच वर्षे पूर्ण झाले नाही.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

हेही वाचा: Nashik News: जमा-खर्चाची माहिती सादर न झाल्यास कारवाई; आयुक्तांकडून सर्व विभागांना अल्टिमेटम!

त्याचप्रमाणे वृक्षांची गणना करताना नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात सरकारी जमिनी असल्याने त्यावर सुरक्षेच्या कारणावरून वृक्षांची गणना करण्यात आली. जसे की, आर्टिलरी सेंटर, करन्सी नोट प्रेस, इंडिया सेक्युरिटी प्रेस, पोलिस ट्रेनिंग सेंटर या महत्त्वाच्या ठिकाणांवरील जनगणना अद्याप पूर्ण झाली नसताना आता नव्याने वृक्ष गणना करण्याचा घाट घातला जात आहे.

आकडेवारीची लपवालपवी

वृक्ष संरक्षण व संवर्धन कायद्यात दर पाच वर्षांनी वृक्षगणना केली पाहिजे असा उल्लेख आहे. परंतु महापालिकेच्या उद्यान विभागाने बंधनकारक, असा दावा करून नवीन वृक्षगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन वृक्षगणना करताना शहरात आतापर्यंत किती वृक्षांची तोड झाली याची आकडेवारी मात्र दिली जात नाही.

"नियमानुसार दर पाच वर्षांनी वृक्षगणना बंधनकारक आहे. त्यानुसार प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अद्यापपर्यंत निविदा प्रक्रिया राबवली नाही."

- विजयकुमार मुंडे, उद्यान, उपायुक्त, महापालिका.

हेही वाचा: Kamgar Kalyan Natya Spardha : आत्मभान जागविणारे ‘काय डेंजर वारा सुटलाय!’

टॅग्स :NashiknmcGardenGardening