Advocate Shriram Pingale
sakal
नाशिक: शहरातील काही ठिकाणी वृक्षांचा विस्तार कमी करण्यासंदर्भात दिलेल्या महापालिकेच्या नोटिशीवर तीव्र आक्षेप नोंदवत सर्वोच्च न्यायालयाचे ऑन रेकॉर्ड ॲड. श्रीराम पिंगळे यांनी हरकत घेतली आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या स्पष्ट आदेशांनंतरही नोटीस काढणे म्हणजे थेट कायद्याचे उल्लंघन असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे नाशिकमधील वृक्षतोडीचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला असून, पर्यावरणप्रेमींमध्ये अस्वस्थता आणि उत्सुकता निर्माण झाली आहे.