Tree Plantation : लासलगाव महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम

Tree Plantation Program
Tree Plantation Programesakal

नाशिक : नूतन विद्या प्रसारक मंडळाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लासलगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ,"स्वच्छ भारत अभियान" या उपक्रमा अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या नियमित तासिकेला महाविद्यालय परिसरात स्वच्छता करण्यात आली. दिनांक. १४ व १५ ऑक्टोबर २०२२ या दोन दिवसांत वृक्षारोपण अभियान राबवण्यात आले. (Tree Plantation Program in Lasalgaon College Nashik Latest Marathi News)

Tree Plantation Program
Anand Mahotsav 2022 | शास्त्रीय संगीत टिकविण्यासाठी प्रयत्नांची गरज : सचिन चंद्रात्रे

या अभियानासाठी नूतन विद्या प्रसारक मंडळाचे, सेक्रेटरी मा. तात्यासाहेब गोविंदराव होळकर व महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. दिनेश नाईक यांचे सखोल मार्गदर्शन लाभले. दोन दिवसाच्या अभियानात महाविद्यालय परिसरात सुशोभीकरण करण्यासाठी १०००० स्क्वेअर फूट मध्ये लॉनची लागवड करण्यात आली. महाविद्यालय परिसर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी १७५ गुलाबांच्या रोपांची लागवड करण्यात आली. महाविद्यालय इमारतीच्या दोन्ही बाजूला सुशोभीकरण करण्यासाठी विविध १५० शोभिवंत रोपांची लागवड करण्यात आली.

लागवडीसाठी कोणत्या रोपांची लागवड करावी याबद्दल आभ्यासपूर्ण माहितीने डॉ.प्रदीप सोनवणे यांनी लागवडीसाठी रोपांची निवड केली.वृक्षारोपण व लॉन लागवडीसाठी महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ. आदिनाथ मोरे,विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. भूषण हिरे, मारोती कंधारे व डॉ. उज्वला शेळके उपस्थित होते. या अभियानात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या ३२५ विद्यार्थ्यांनची लॉन लागवड व वृक्षारोपण कामासाठी सहा गटात कामाची विभागणी करण्यात आली.

सर्व विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे मेहनत व परिश्रम घेऊन दोन दिवसांत हे अभियान पूर्ण केले. महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.मिलिंद साळुंके यांनी विद्यार्थ्यांनी दोनदिवसाच्या अभियानात केलेल्या कामाच्या योगदानाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांनचे अभिनंदन केले.

Tree Plantation Program
Nashik : गंगापूर धरणातून रोज 600 क्यूसेक पाणी गोदावरी पात्रात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com