पाऊलखुणा शिखरांच्या.. अन्‌ क्षितिजापलीकडच्या वाटा!

पाऊलखुणा शिखरांच्या.. अन्‌ क्षितिजापलीकडच्या वाटा!
Published on: 
(६ वा लेख) फोटो - NSK26H32768 हिमालयीन ट्रेकसाठी सर्वांत पसंतीचे ठिकाण.. चंद्रतल तलाव. ---- NSK26H32767 महाराष्ट्रातील कळसूबाई शिखर.. ट्रेकिंगसाठीचे अत्यंत आकर्षक व उत्तम ठिकाण. ----- NSK26H32765 महाराष्ट्रातील शिखरे ठरताहेत गिर्यारोहकांसाठी आकर्षण. ----- NSK26H32766 (अमेय नेवे) --------- ट्रेकींगला जाताना... पाऊलखुणा शिखरांच्या.. अन्‌ क्षितिजापलीकडच्या वाटा! गेल्या काही वर्षांत खान्देश आणि उत्तर महाराष्ट्रातील पर्यटन संस्कृतीत एक सकारात्मक अमुलाग्र बदल घडून आला आहे. सुट्टी मिळताच सुट्टीचे किती दिवस आहेत, त्या अनुषंगाने पर्यटनाचा बेत आखला जातो. दोन, चार, सहा, आठ दिवस आणि यासोबत खिशाला परवडेल व सुरक्षित अशा पर्यटन स्थळांची निवड आवर्जून केली जाते. - अमेेय नेवे धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिक या उत्तर महाराष्ट्राच्या पट्ट्यातून ट्रेकिंगकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. पूर्वी ट्रेकिंग म्हणजे केवळ काही धाडसी तरुणांचा छंद मानला जायचा. दोराला धरून डोंगर कपारी चढणे म्हणजे ट्रेकिंग असा गैरसमज कुठेतरी मनामध्ये रुजला होता. मात्र ट्रेकिंग म्हणजे डोंगराळ, दुर्गम किंवा निसर्गरम्य भागात आनंदासाठी किंवा आव्हानात्मक प्रवासासाठी केलेली लांब पायी भटकंती आहे. आज आयटी प्रोफेशनल्स, डॉक्टर्स, बँकर्स, सी एस, व्यावसायिक वर्ग, शिक्षक वर्ग, पासून तर गृहिणी, कॉलेजचे तरुण-तरुणी आणि अगदी शाळकरी मुलेदेखील मोठ्या उत्साहाने ट्रेकिंगमध्येे सहभागी होत आहेत. आठवडाभरचा कामाचा थकवा काढण्यासाठी आणि एक नवीन ऊर्जा भरण्यासाठी शनिवार- रविवारी ट्रेकिंग करणे म्हणजे स्ट्रेस घालवण्यासाठीच रिसेट बटन मानले जाते. पूर्वी जशी पद्धत होती की, सुट्ट्यांमध्ये मॉल्स किंवा गर्दीच्या पर्यटनस्थळांवर जावे. आता तेथे जाण्याऐवजी ऐतिहासिक गडकिल्ले, घनदाट अरण्ये आणि निसर्गाच्या कुशीत स्वतःला शोधण्यासाठी लोक पुढे येत आहेत. त्यासोबत फिटनेसची आवड आणि ताणतणावमुक्त जीवनाची ओढ यामुळे खानदेशातून बाहेर पडणाऱ्या ट्रेकर्सची संख्या वेगाने वाढली आहे. महाराष्ट्रातील ‘सुवर्णस्पॉट्स’ भटक्यांची पंढरी मानला जाणारा हरिश्चंद्रगड आणि त्यालाच लागून असलेला कोकणकडा, यासोबत महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर म्हणजेच कळसूबाई, आशिया खंडातील दोन नंबरची सर्वात मोठी दरी म्हणजे सांदण दरी, याशिवाय रतनगड, हरिहर किल्ला, आदराई जंगल ट्रेक, काळू धबधबा, अंधारबन जंगल ट्रेक, भीमाशंकर ते भोरगिरी ट्रेक, अंकाई - टंकाई या ठिकाणांना खानदेशी पर्यटकांची पहिली पसंती असते. ट्रेकर्सचा कायमचा आवडता स्पॉट असलेल्या ‘कळसूबाई’चे शिखर सर करताना मिळणारा आनंद आणि हरिश्चंद्रगडची कोकणकडा पाहण्याची अनुभूती अद्वितीय आहे. खानदेश आणि लगतच्या परिसरातील ऐतिहासिक गड पर्यटकांना आकर्षित करतात. तर रायगडचा अनुभव सुद्धा अद्वितीय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा सांगणारा रायगड पर्यटन प्रेमींना नेहमी साद घालत असतो आणि स्फूर्ती देणारा ठरतो. राज्याबाहेरील प्रसिद्ध स्पॉट्स हिमाचल प्रदेशातील सार-पास, हमटा-पास आणि चंद्रताल लेक, चंद्रखणी पास, स्पिती व्हॅली तसेच उत्तराखंडमधील केदारकंठ, ब्रह्मताल, कुवारी पास, चोपटा तुंगनाथ, चंद्रशिला आणि देओरिया ताल इत्यादी ट्रेक पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असतात. याशिवाय अंदमानचा टूर पर्यटकांच्या पसंतीस उतरतो. इथला निखळ आनंद देणारा स्वच्छ सुंदर आणि प्रदूषणापासून दूर असलेला निसर्ग पाहायला मिळतो. सावरकरांच्या आठवणी या ठिकाणी डोळे पाणावून जातात. सेल्युलर जेल हा परिसर पर्यटक म्हणून नव्हे तर एक भारतीय म्हणून हृदयात जतन करण्यासारखा आहे. इतकेच नव्हे; तर आजही त्या ठिकाणी असलेली ‘जारवा’ ही आदिवासी जमात त्यांच्या मूळ रूपात येथे पाहायला मिळते. निळाशार समुद्र, समुद्रा खालच्या आश्चर्यचकित करणाऱ्या घडामोडी स्कुबाच्या माध्यमातून या टूरमध्ये अनुभवायला मिळतात आणि शिवाय अंदमान हे अतिशय सुरक्षित पर्यटन स्थळ आहे, म्हणून सुद्धा अंदमानचा टूर पर्यटकांचे आकर्षण ठरते. वेळेचे अचूक नियोजन ट्रेकला निघण्यापूर्वी, अगदी कुठल्या वेळी आपण कुठे असणार? म्हणजे कुठल्या स्पॉटवर असणार? तिथून किती वाजता निघायचे? याचे अचूक नियोजन करावे लागते. त्यामुळे वेळेचे काटेकोर नियोजन करणे गरजेचे असते. कळसुबाईसारखे उंच पर्वत सर करताना थोडा जास्तच चढाव लागतो. त्यामुळे काही विशिष्ट तंत्र आणि ट्रिक्सचा वापर करून तसेच श्वासावर नियंत्रण ठेवून कळसूबाईच्या ट्रेक यशस्वी केला जातो. यासोबत काही छोट्या छोट्या गोष्टी पाळाव्या लागतात जसे एकदम पाणी न पिता एकेक घोट पाणी प्यावे लागते, इलेक्ट्रॉल किंवा ओआरएस, लिंबू पाणी हे सोबत ठेवून थोडे थोडे प्यावे लागते. असे केल्यास शरीरात ऊर्जा टिकून राहते. हिमालयीन ट्रेक.. अद्‌भुत अन्‌ आव्हानात्मक हिमालयीन परिसरामध्ये ट्रेकला जाण्यापूर्वी दीड ते दोन महिने चालण्याचा सराव करावा लागतो. साधारणतः ५० मिनिटांमध्ये ५ किलोमीटर चालण्याचा सराव प्रत्येकाकडून करवून घेतला जातो. त्याचा नियमित पाठपुरावा घेतला जातो. हिमालयात ट्रेकला जायच्या आधी ट्रेक करणाऱ्या व्यक्तीचे एक मेडिकल चेकअप करून त्याचे सर्टिफिकेट घेतले जाते. डॉक्टरांची काही प्रिस्क्रीप्शन्स आहेत का, हे सुद्धा जाणून घेतले जाते. हिमालयीन ट्रेकमध्ये परराज्यामध्ये बऱ्याच वेळा फसवणूक होण्याची भीती असते. त्यामुळे अनुभवी टूर कंपन्यांच्या माध्यमातूनच ट्रेकचे नियोजन करणे फायदेशीर ठरते. कारण विश्वसनीय लोकांसोबत त्यांचे टायअप असतात. पाऊस, पूर, स्नो फॉल झाला तर उपाययोजना या तयार ठेवाव्या लागतात. यातले महत्त्वाचे चॅलेंज म्हणजे जेवण. जेवण योग्य वेळी आणि हवे तसे मिळण्यासाठी किचन टीम सोबत ठेवावी लागते. नेपाळी शेफ सोबत ठेवावे लागतात. हिमालय ट्रेकमध्ये महत्त्वाचा एक मुद्दा म्हणजे AMS. उंच ठिकाणावरील हाय एलटीट्यूडच्या (ऑक्सीजन कमी असलेल्या) ट्रेक्समध्ये ‘माउंटेन सिकनेस’ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे होऊ नये यासाठी आधीपासूनच सूचना आपण देत असतो. जे लोक या सूचना पाळत नाहीत, त्यांना ‘ए एम एस’ होण्याची भीती असते. आता या सूचना काय असू शकतात तर प्रॉपर खाणे- पिणे याचे वेळापत्रक पाळणे, शरीर हायड्रेटेड ठेवणे म्हणजेच थोड्या थोड्या वेळाने पाणी अथवा काही लिक्विड घेत राहणे, तसेच या संदर्भातले जे बारीक नियम आहेत, ते पाळणे. अशा ट्रेकमध्ये ‘ऑन द स्पॉट’ कुठलेही प्रॉब्लेम येऊ शकतात. यासाठी तेथील लोकल टीम आणि लोकल गाइड आपल्या सोबत असतात, जे प्रॉपर प्रशिक्षित असतात त्यांचे माउंटेनियरिंग कोर्स झालेले असतात. आणि हे सगळे करीत असताना क्रिटिकल स्थिती आलीच तर पुढील काही गोष्टी या कॅन्सल कराव्या लागतात, कारण सेफ्टीला प्राधान्य दिले जाते. ट्रेकला जाताना.. ही घ्या काळजी! महाराष्ट्रातील कुठल्याही ट्रेकला जाताना रोज थोडेफार चालणे असेल तर ट्रेकला आपण येऊ शकतात हे लक्षात घ्यावे. ज्यांना चालायची सवयच नाही त्यांच्यासाठी ट्रेक थोडा अवघड होऊ शकतो. दररोजचे चालणे दोन ते तीन किलोमीटर असेल तर ते महाराष्ट्रातील ट्रेकसाठी पुरे आहे, पण ट्रेकला जायचे ठरविल्याच्या दिवसापासून तर ट्रेकला जायच्या दिवसापर्यंत जरा जास्त चालायचा सराव केला तर ट्रेक आणखीच सोपा वाटेल. हिमालयन ट्रेकसाठी रोज किमान ५ किलोमीटर चालणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील ट्रेक असेल तर सामान्य स्पोर्टस्‌ शूज चालतील पण त्या शुजची ग्रीप चांगली असावी. हिमालयीन ट्रेकमध्ये वॉटरप्रूफ ट्रेकिंग शूज आवश्यक. बर्फाळ प्रदेशमध्ये जाताना आपण प्रॉपर लेअरिंग जे म्हणतो त्यामध्ये एकावर एक जे थर असतात ते अशा प्रकारे, सगळ्यात पहिले थर्मल वेअर त्यानंतर टी-शर्ट त्यावर फ्लिस जॅकेट त्यानंतर डाऊन जॅकेट हे गरजेचे आहे आणि खूपच जास्त थंडी वाजत असेल तर अतिरिक्त डाऊन जॅकेट सोबत घ्यावे. त्या त्या ठिकाणानुसार प्रॉपर लेअरिंग केले तर उणे तापमानातही टेंटमध्ये मुक्काम करू शकतो आणि व्यवस्थित ट्रेक करता येऊ शकतात. - सोबत उत्कृष्ट ट्रेकिंग बॅग आवश्यक आहे. - बॅगेचे स्वतःचं वजन कमी असेल पण कॅरी करण्याची क्षमता चांगली असावी - बॅगेचे बेल्ट मजबूत असावेत, त्यात वेगवेगळे कप्पे असावेत, जेणेकरून जास्तीत जास्त सामान ठेवता येईल. - सोबत लवकर वाळू शकतील असेच कपडे आपण वापरावेत. - चटकन वाळणारा टॉवेल किंवा इतर कपडेसुद्धा सोबत घ्यावेत. - डोळ्यावर पोलराईज सनग्लासेस, एक चांगली टोपी, वॉटरप्रूफ हॅन्ड ग्लोज हवेत. - थंड वातावरणामध्ये गरम पदार्थ घेऊन जाण्यासाठी थर्मास बाटली, मोजांचे काही जोड असावेत. - प्रखर आणि जास्त वेळ टिकणारी टॉर्च किंवा हेड लॅम्प आवश्‍यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com