चांगली बातमी! नाशिक शहर बससेवेच्या ट्रायल रनला सुरवात

nashik city bus service
nashik city bus serviceGoogle

नाशिक : महापालिकेकडून जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून शहर बससेवा सुरू करण्याचे नियोजन सध्या सुरू आहे. त्यासाठी ट्रायल रन सुरू झाला असून, मंगळवारी (ता. २२) पाच मार्गांवर दहा बस चालवून इंटेलिजंट ट्रान्स्पोर्ट मॅनेजमेंट सिस्टिम’ (आयटीएमएस) या संगणकीय प्रणालीची चाचणी करण्यात आली. (trial run of nashik city bus service begins)

महापालिकेकडून शहर बससेवा सुरू केली जाणार असून, तब्बल दोन वर्षांनंतर बससेवेचा मार्ग सुकर होत असल्याचे दिसून येत आहे. शासनाकडून प्राप्त झालेला ना हरकत दाखला, परिवहन विभागाने भाडे निश्चित केल्याने बससेवा रस्त्यावर धावण्याचा मार्ग मोकळा झाला. पहिल्या टप्प्यामध्ये शहरात पन्नास बस सुरू केल्या जाणार आहेत. त्यानंतर राज्य परिवहन महामंडळाकडून टप्प्याटप्प्याने रस्त्यावरील बसची संख्या कमी केली जाणार आहे. ‘ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट’ तत्त्वावर बससेवा चालविण्यासाठी नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. इव्हे ट्रान्स लिमिटेड, ट्रॅव्हल टाइम कार रेंटल प्रायव्हेट लिमिटेड (पुणे) व सिटी लाइफलाइन प्रायव्हेट लिमिटेड (गुडगाव) या तीन ऑपरेटर्समार्फत सुमारे चारशे मार्गांवर बस चालविल्या जाणार आहेत. बससेवा सुरू करण्यासाठी २४ जूनला बैठक होणार आहे. त्यानंतर बसचा ट्रायल रन घेतला जाणार आहे. पारंपरिक पद्धतीने बस न चालविता संगणकीय प्रणालीचा वापर करून आधुनिक सुविधा पुरविल्या जाणार आहेत. त्यासाठी नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेकडून वापरात येणारी इंटेलिजंट ट्रान्स्पोर्ट मॅनेजमेंट सिस्टिम या संगणकीय प्रणालीचा वापर केला जाणार आहे. या सुविधांची चाचणी मंगळवारी (ता. २२) घेण्यात आली. मे. अॅमनेक्स इन्फोटेक्नोलॉजीस प्रा. लिमिटेडतर्फे सुविधांची चाचणी करण्यात आली.

nashik city bus service
पोटच्या पोरीप्रमाणे गाईचं डोहाळं जेवण! गावाकडून गोड कौतुक

या मार्गावर झाला ट्रायल रन

नाशिक रोड-शालिमार, नाशिक रोड-निमाणी, शालिमार-पंचवटी, नाशिक रोड-सातपूर, नाशिक रोड-सीबीएस-सातपूर या पाच मार्गांवर मंगळवारी पहिल्यांदा दहा बस धावल्या. बसचे लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज, जीपीएस संदर्भातील माहिती मोबाईल अॅपवर पोचते की नाही, अशा यातील अडचणी समजून घेण्यात आल्या.

या आहेत सुविधा

आधुनिक सुविधांमध्ये सर्व बसमध्ये जीपीएस प्रणाली बसविली जाणार असून, त्याद्वारे बस कुठल्या मार्गावर धावते आहे हे समजणार आहे. बसमध्ये व बाहेरील बाजूस सीसीटीव्ही लावले जाणार आहे. सीसीटीव्हीचे नियंत्रण कमांड ॲन्ड कंट्रोल सेंटरकडे राहणार आहे. गोल्फ क्लब येथे उभारण्यात आलेल्या परिवहन कार्यालयातील कमांड कंट्रोल सेंटरकडे नियंत्रण राहणार आहे. बस जीपीएस यंत्रणेशी संलग्न राहणार असून, इलेक्ट्रिक टिकेटिंग सिस्टिम, प्रवाशांसाठी सेंट्रल कमांड सेंटर, मोबाईल अॅपवर बसची नियोजित वेळ व सध्या अपेक्षित असलेली बस कुठल्या ठिकाणी आहे, या संदर्भातील लोकेशन आदींची माहिती मिळणार आहे.

nashik city bus service
कोवीड सोबत दुष्काळाचीही चाहुल? बळीराजा हवालदील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com