Teachers
sakal
नाशिक: आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची तब्बल एक हजारांवर पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. एकट्या नाशिक विभागातच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ५८० पदे रिक्त आहेत. त्यावर तोडगा म्हणून शासनाने कंत्राटी भरतीचा पर्याय अवलंबिला असून, बाह्यस्त्रोत भरतीच्या माध्यमातून एक हजार ७९१ पदे भरण्यात आली.