जनजाती गौरव सेवा सप्ताहात आदिवासी बांधवांना विविध दाखले व शिधापत्रिकांचे वाटप

जनजाती गौरव सेवा सप्ताहात आदिवासी बांधवांना विविध दाखले व शिधापत्रिकांचे वाटप
Published on: 
05423 इगतपुरी : आदिवासी बांधवांना विविध दाखले वाटप करताना निवासी नायब तहसीलदार धनंजय लचके सोबत उपस्थित आदिवासी बांधव. इगतपुरीत आदिवासी बांधवांना विविध दाखले, शिधापत्रिकांचे वाटप सकाळ वृत्तसेवा घोटी, ता. १७ : क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त इगतपुरी तहसील कार्यालयात जनजाती गौरव सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कातकरी व आदिवासी बांधवांना १२५ जात प्रमाणपत्रे, १५० शिधापत्रिका, ४५ दुय्यम शिधापत्रिका तसेच ३३ उत्पन्न दाखल्यांचे नायब तहसीलदार धनंजय लचके यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी आदिवासी बांधवांच्या विविध समस्या जाणून घेत त्याबाबत संबंधित खातेप्रमुखांना अहवाल सादर करून तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे नागरिकांच्या समस्या संबंधित विभागांपर्यंत पोहोचवून त्यावर तत्काळ उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला. आदिवासी विभागाचे सहायक प्रकल्प अधिकारी राजेंद्र महाले यांनी आदिवासी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपस्थित लाभार्थ्यांना दिली. तसेच आदिवासी बांधवांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी महसूल सहायक विनोद जागले यांच्यासह महसूल व आदिवासी विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमामुळे आदिवासी बांधवांना आवश्यक दाखले व शासकीय योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.