नाशिक- शासकीय आश्रमशाळेत तासिका तत्त्वावर शिकविणाऱ्या शिक्षकांना सेवेत कायम करण्यास आदिवासी विकासमंत्री प्रा. अशोक उईके यांनी स्पष्टपणे नकार दिला आहे. विधिमंडळाच्या अधिवेशात मंगळवारी (ता. १५) त्यांनी रोजंदारी कर्मचाऱ्यांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. मंत्र्यांनी स्पष्टपणे नकार दिल्यानंतर संतापलेल्या नाशिकमधील आंदोलकांनी आदिवासी आयुक्तालयात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना वेळीच रोखले.