SHC26B13580
टेंभेपाडा (ता. शिरपूर) : विद्यार्थ्यांसोबत दिवाळी साजरी करताना डॉ. राखी अग्रवाल.
--------
भारत विकास परिषदेची
आदिवासींसोबत दिवाळी
शिरपूर, ता. ३ : येथील भारत विकास परिषदेतर्फे सोमवारी (ता. २) टेंभेपाडा (ता. शिरपूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांसोबत फराळ व फटाके वाटप करुन सामूहिक दिवाळी साजरी करण्यात आली.
पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या दिनक्रमाची माहिती घेतली. २४० विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ व फटाक्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी कराओके ट्रॅकच्या साथीने सामुदायिक गीतगायन केले. या वेळी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे तयार केलेल्या आकर्षक गडकिल्ल्यांचे प्रदर्शनही भरविण्यात आले. दुर्गम आदिवासी भागात असलेल्या शाळेतील स्वच्छता, शिस्तबद्ध वातावरण, विद्यार्थ्यांचे संस्कार, आत्मविश्वास आणि शिक्षकांची विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता पाहून भारत विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ. आशिष अग्रवाल, महिला समन्वयक डॉ. राखी अग्रवाल, सचिव प्रकाश महाजन, सेवा समन्वयक डॉ. अनिल पाटील यांपी समाधान व्यक्त केले. अशोक सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. ताराचंद पावरा यांनी आभार मानले. मुख्याध्यापक साहेबराव पावरा, सुनील पावरा, जंगलसिंह पावरा, विनायक पालवे, संदीप चव्हाण, स्नेहल पाटील यांनी संयोजन केले.