मुंबईसारख्या शहरांमध्ये आदिवासी एम्पोरिअमची गरज

मुंबईसारख्या शहरांमध्ये आदिवासी एम्पोरिअमची गरज
Published on: 
फोटो : 31562 नाशिक : आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांचे मंगळवारी स्वागत करताना आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड. मुंबईसारख्या शहरांमध्ये आदिवासी एम्पोरिअमची गरज अध्यक्ष विवेक पंडित : राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समितीचे प्रशासनाला निर्देश सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ६ : आदिवासी बांधवांची समृद्ध, वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आणि परंपरा खऱ्या अर्थाने जगाच्या नकाशावर पोहोचवण्यासाठी मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये भव्य ''आदिवासी एम्पोरिअम'' उभारण्यात यावे, तसेच आदिवासी बांधवांच्या उपजीविका वृद्धीसाठी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ करत असलेल्या कामकाजाचा समावेश शासनाच्या ‘व्हीजन डॉक्युमेंट २०४७''‘ मध्ये करण्यात यावा, अशा महत्त्वपूर्ण सूचना राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) विवेक पंडित यांनी दिल्या. नाशिक येथील आदिवासी विकास भवनात, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या परिषद सभागृहात आयोजित विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आदिवासी विकास आयुक्त तथा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, अपर आयुक्त दिनकर पावरा, प्रकल्प अधिकारी अर्पिता ठुबे, उपायुक्त विनिता सोनवणे, शशिकला अहिरराव, संतोष ठुबे, सहसंचालक (लेखा) कपिल पवार, महाव्यवस्थापक जयरेखा निकुंभ उपस्थित होते. अध्यक्ष पंडित म्हणाले, ‘वारली, गोंडी आणि चित्रकथी यांसारख्या पारंपरिक चित्रकला, वैशिष्ट्यपूर्ण तारपा वाद्य, पारंपरिक नृत्ये आणि आरोग्यदायी आदिवासी खाद्यसंस्कृती या सर्वांवर सध्या आंतरराष्ट्रीय मानकांनुसार काम सुरू आहे. या प्रयत्नांमुळे शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाने शासनाचा एक अत्यंत विश्वासार्ह आणि जागतिक दर्जाचा ब्रँड विकसित केला. आदिवासी भागातील शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ), गरजू घटकांसाठी असलेल्या वैयक्तिक लाभाच्या सुलभ कर्ज योजना आणि सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी राबविण्यात येणाऱ्या ''एकलव्य कुशल'' आधारित कौशल्य विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. या उपक्रमांमुळे स्थानिक पातळीवर आदिवासी तरुणांना व महिलांना शाश्वत रोजगार मिळून, त्यांच्या उत्पादनांना ''शबरी नॅचरल्स''च्या माध्यमातून व्यापक बाजारपेठ उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले. आयुक्त लीना बनसोड यांनी महामंडळाच्या विविध योजनांची सद्यःस्थिती व प्रगती अहवाल मांडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com