आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण

आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण
Published on: 
मेनफिचर शहर टुडे पान तीनसाठी ---------- NSK26H35080 जळगाव : जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात रविवारी जनजातीय गौरव दिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर आदी. --------------- आदिवासी बांधवांच्या विकासासाठी समाजाचा सहभाग महत्त्वाचा ----- केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे : जनजातीय गौरवदिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.१५ : केवळ रस्ते, पूल यांसारख्या भौतिक सुविधांचा विकास म्हणजे समाजाचा सर्वांगीण विकास नव्हे, तर त्यासाठी वैचारिक प्रगल्भताही तितकीच महत्त्वाची आहे. आदिवासी बांधवांच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासन विविध कल्याणकारी योजना राबवीत आहेत. मात्र, या योजनांचा लाभ तळागाळातील शेवटच्या घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी समाजातील सुशिक्षित नागरिक व युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले. आदिवासी विकास विभागांतर्गत यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीने क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१व्या जयंतीनिमित्त रविवारी (ता.१५) आयोजित जनजातीय गौरवदिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून मंत्री खडसे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जलसंपदामत्री गिरीश महाजन होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार स्मिता वाघ, शहराचे आमदार सुरेश भोळे, अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, प्रकल्प अधिकारी अरुण पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रमेश धापके, तहसीलदार शीतल राजपूत, सहायक प्रकल्प अधिकारी प्रवीण दाभाडे, पवन पाटील, मिनाक्षी सुलताने, लेखाधिकारी दिपकांत वाघ, मनेश तडवी, आदिवासी संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. नव्या पिढीपर्यंत इतिहास पोहोचावा भगवान बिरसा मुंडा यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी व आदिवासी अस्मितेच्या रक्षणासाठी दिलेला लढा, त्यांचे क्रांतिकारी कार्य, सर्वोच्च बलिदानाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. त्यांच्या संघर्षातून तरुणांमध्ये देशप्रेमाची भावना व प्रेरणा निर्माण झाली पाहिजे, असे मत मंत्री महाजन यांनी व्यक्त केले. आदिवासी समाज हा शब्दाला जागणारा समाज आहे. तो जे बोलतो तेच करतो व जे करतो तेच सांगतो, अशा शब्दांत खासदार वाघ यांनी आदिवासी समाजाच्या प्रामाणिकपणाचा गौरव केला. चित्रमय जीवनपट, योजनांचे प्रदर्शन जिल्हा नियोजन समितीच्या कार्यालय परिसरात भगवान बिरसा मुंडा, प्रेरणादायी जीवनप्रवास चित्रमय फलक आकर्षक रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आला होता. पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे निवड झालेल्या उमेदवारांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन यावेळी गौरव करण्यात आला. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बचत गटाला १० हजार रुपयांचा धनादेश, प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. विविध शासकीय योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांचाही प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत सादर केलेल्या नृत्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. शहरातून निघाली रॅली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातर्फे जळगाव शहरात रॅली काढण्यात आली. प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी केले. हर्षल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सहायक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.