आदिवासींची दिशाभुल करणाऱ्या कॉंग्रेसला जागा दाखवा

आदिवासींची दिशाभुल करणाऱ्या कॉंग्रेसला जागा दाखवा
Published on: 
(टुडे पान एक अँकर) NSK26H35171 अक्कलकुवा : कार्यक्रमात बोलताना डॉ. हीना गावित. शेजारी नागेश पाडवी, किरसिंग वसावे, प्रताप वसावे, जगदीश वळवी, विनोद कामे आदी. --- दिशाभूल करणाऱ्या काँग्रेसला जागा दाखवा डॉ. हीना गावित : अक्कलकुव्यात जनजातीय गौरव दिवस सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. १७ : काँग्रेस पक्ष अनेक वर्ष सत्तेत होता. परंतु स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या आदिवासींचा इतिहास त्यांच्या काळात देशातल्या जनतेसमोर आला नाही. आता मोदी सरकारमुळे देशाला आदिवासींचा गौरवशाली इतिहास माहीत होत आहे. मात्र आदिवासी समाजाची दिशाभूल करण्याचे काम काँग्रेस नेत्यांनी पुन्हा सुरू केले आहे. ‘जनजाती’ शब्द अपमानास्पद असल्याचे खोटे सांगून आदिवासींच्या गौरव दिनाला विरोध केला जात आहे. घाणेरडे राजकारण करणाऱ्यांना जनतेने जागा दाखवावी, अशा परखड शब्दांत डॉ. हीना गावित यांनी काँग्रेस पक्षाचा समाचार घेतला. क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त अक्कलकुवा येथे भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा, तसेच जनजातीय गौरव दिवस कार्यक्रमात त्या बोलत होत्या. डॉ. हीना गावित म्हणाल्या, की खासदार गोवाल पाडवी हे स्वतःला वकील म्हणवतात. परंतु ‘जनजाती’ हा शब्द संविधानात आहे, हे त्यांना माहीत नाही. अनुसूचित जमाती शब्दालाच हिंदीत जनजाती म्हणतात. जनजाती हा शब्द संविधानिक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या मूळ संविधानातच अनुसूचित जमातीला उद्देशून शेड्युल ट्राईब शब्दाचा उल्लेख आहे. आदिवासी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेसने आदिवासींचा गौरव कधीच केला नाही. स्वातंत्र्यासाठी लढलेल्या आदिवासींचा गौरवशाली इतिहास जनतेसमोर आणला नाही. आदिवासी शूरवीरांचा उल्लेख इतिहासात समाविष्ट व्हायला हवा. यामुळे जनजातीचे गौरवशाली योगदान पुढच्या पिढीला माहीत होईल. यासाठी आम्ही केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू केला आहे. गोवाल पाडवी यांनी जनजाती दिनाला विरोध करण्यापेक्षा आदिवासींच्या विकासासाठी कोणत्या योजना आणल्या हे सांगावे, असा टोला डॉ. हीना गावित यांनी लगावला. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांनी प्रास्ताविकात जनजाती गौरव दिनाची भूमिका स्पष्ट केली. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरसिंग वसावे, प्रताप वसावे, जगदीश वळवी, विनोद कामे यांनी आदिवासींच्या गौरवार्थ मोदी सरकारने सुरू केलेल्या योजना आणि उपक्रमांचा अभिमान असल्याचे सांगितले. राजमोहीचे जयमल पाडवी, भूपेंद्र पाडवी, अलीविहीरचे किसन नाईक, नवानगरचे नरेश पाडवी, रोशन पाडवी, अशोक राऊत, किशोर वळवी, ॲड. सुधीर पाडवी, भाबलपूरचे विजय पाडवी, दिलीप वसावे, कथूराम सैंदाणे आदी या वेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.