जनजातीय गौरव सप्ताहात देवळा तालुक्यात विशेष शिबिरांचे आयोजन; लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकांचे वाटप करण्याचे नियोजन

जनजातीय गौरव सप्ताहात देवळा तालुक्यात विशेष शिबिरांचे आयोजन; लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकांचे वाटप करण्याचे नियोजन
Published on: 
जनजातीय गौरव सप्ताहात देवळा तालुक्यात विशेष शिबिर सकाळ वृत्तसेवा देवळा, ता. १७ : क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त देवळा तालुक्यात जनजातीय गौरव सप्ताह साजरा करण्यात येत असून या सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी समाजातील पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासह त्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात येणार आहे. अशी माहिती तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी दिली. आदिवासी समाजातील पात्र लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी आवश्यक सेवा व योजनांची माहिती उपलब्ध व्हावी, या उद्देशाने विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात येणार असून, कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देऊन पात्र शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळवून देण्याचे नियोजन आहे. वन विभाग आणि पशुसंवर्धन विभागामार्फतही आदिवासी बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती व लाभ वितरणाची कार्यवाही केली जाणार आहे. शिबिरांमध्ये आरोग्य विभागामार्फत आरोग्य तपासणी शिबिर घेऊन आदिवासी बांधवांच्या आरोग्यविषयक समस्यांची तपासणी व आवश्यक मार्गदर्शन केले जाणार आहे. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, यासाठी महिला बचत गटांना कर्जवाटप तसेच बचत गटांच्या कामकाजासंदर्भात कार्यशाळेचेही आयोजन करण्यात येणार आहे. महसूल विभागामार्फत लाभार्थ्यांना ७/१२ व ८-अ उताऱ्यांचे वाटप करण्याचाही उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे महसुली कागदपत्रांशी संबंधित कामांसाठी नागरिकांना मदत होणार आहे. शिबिरांमध्ये सहभागी होऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार डॉ. कुलकर्णी यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.