आदिवासींच्या हक्कांसाठी संघटित संघर्षाशिवाय पर्याय नाही - बाळाराम भोईर

आदिवासींच्या हक्कांसाठी संघटित संघर्षाशिवाय पर्याय नाही - बाळाराम भोईर
Published on: 
पान-२ अँकर फोटो : 05419 वाळविहीर (ता. इगतपुरी) : श्रमजीवी संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात बोलताना राज्य कार्यध्यक्ष बाळाराम भोईर. शेजारी उपस्थित जनसमुदाय. आदिवासींच्या हितासाठी हक्काचा कायदा गरजेचा बाळाराम भोईर ः वाळविहीर येथे श्रमजीवी संघटनेचा ४४ वा वर्धापन दिन सकाळ वृत्तसेवा घोटी, ता. १५ : आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या श्रमजीवी संघटनेचा ४४ वा वर्धापन दिन तथा कृतज्ञता दिन वाळविहीर (बैरोबाचीवाडी) (ता. इगतपुरी) येथे झाला. या वेळी संघटनेच्या संघर्षातून आदिवासी समाजाला मिळालेल्या विविध हक्कांची आणि शासनाच्या निर्णयांची माहिती देण्यात आली. जल, जंगल, जमीन, वनपट्टे, आधारकार्ड, जातीचे दाखले, रेशनकार्ड, घरकुल तसेच घराखालील जागा यासाठी संघटनेने सातत्याने लढा दिला असून, यामुळे अनेक प्रश्न सुटले आहेत. आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण आणि शासनाच्या निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी आदिवासी हिताचा हक्काचा कायदा गरजेचा आहे, अशी भूमिका या वेळी मांडण्यात आली. संघटनेचे कार्याध्यक्ष बाळाराम भोईर म्हणाले, की आदिवासांना आपले हक्क सहजासहजी मिळालेले नाहीत. विवेक पंडित यांचे मार्गदर्शन, संघटनेच्या सातत्यपूर्ण संघर्षामुळे अनेक शासन निर्णय झाले आणि विविध हक्क मिळाले. मात्र निर्णय कागदावरच राहू नये. त्यांची गावागावांत अंमलबजावणी होण्यासाठी संघटितपणे संघर्ष गरजेचा आहे. कार्यक्रमात २७ तारखेच्या संविधान हक्क संघर्ष मोर्चातील मागण्या, शासन निर्णय आणि त्यांची अंमलबजावणी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आदिवासी समाजाच्या पारंपरिक रानभाज्या, करांदे, चाईची भाजी, कडूकंद, उलस आदींचा नैवेद्य करण्यात आला. कांबड नाच, मोरगा नाच तसेच आदिवासी गीतांवर चिमुकल्यांनी नृत्य सादर केले. विलास शेलार, जिल्हा सरचिटणीस संजय शिंदे, तालुकाध्यक्ष गोकुळ हिलम, तालुका सचिव सुनील वाघ, शिवराम ठोंबरे, तुळशीराम ठोंबरे, संपत लोते, सखूबाई भस्मे, संगीता आवाली, तुकाराम झुगरे, अलका आघान, गंगाराम वाघ आदी उपस्थित होते. ....................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.