आदिवासी बांधवांचा चौथ्या दिवशीही ठिय्या; मागण्यांवर ठोस निर्णयाची प्रतीक्षा

आदिवासी बांधवांचा चौथ्या दिवशीही ठिय्या; मागण्यांवर ठोस निर्णयाची प्रतीक्षा
Published on: 
फोटो संधीपाल आदिवासींचे गेट बंद आंदोलन फोटो. NSK26H32502 जळगाव : आंदोलनाला बसलेले आदिवासी बांधवांनी गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर बसून कर्मचाऱ्यांचा रस्ता बंद केला. ------------- NSK26H32511 आंदोलनस्थळी असलेला पोलिस बंदोबस्त. आदिवासी बांधव मागण्यांवर ठाम चौथ्या दिवशीही ठिय्या; आंदोलकांना निर्णयाची प्रतीक्षा सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.१५ : वनहक्क दाव्यांचा निपटारा, दुष्काळग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांना आर्थिक मदत, गावठाणातील घरांचे प्रश्न आणि विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा, या मागण्यांसाठी लोक संघर्ष मोर्चाच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले आदिवासी बांधवांचे ठिय्या आंदोलन गुरुवारी (ता. १५) चौथ्या दिवशीही सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलक ठाण मांडून बसले असून, प्रलंबित प्रश्नांवर ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका मोर्चाच्या वतीने घेण्यात आली आहे. चार दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे आदिवासी बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आहे. लोक संघर्ष मोर्चाच्या संस्थापक अध्यक्ष प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता. १२) कोर्ट चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. मागण्यांचे निवेदन देऊन प्रश्न सोडविण्याची मागणी करण्यात आली. वनहक्क दाव्यांवरून संघर्ष जळगाव जिल्ह्यातील वैयक्तिक आणि सामुदायिक वनहक्कांचे प्रलंबित दावे निकाली काढण्याची मागणी आंदोलनात प्राधान्याने करण्यात आली आहे. अनेक दावेदारांना त्यांच्या हक्कांबाबत निर्णयाची प्रतीक्षा करावी लागत असल्याचा मुद्दा मोर्चाने उपस्थित केला आहे. सर्व प्रलंबित दाव्यांची तालुकानिहाय आणि गावनिहाय यादी जाहीर करावी, पात्र दावे केवळ तांत्रिक त्रुटी किंवा कागदपत्रांच्या अभावामुळे नाकारू नयेत आणि नाकारलेल्या दाव्यांची कायद्यानुसार पुनर्तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या, घरकुल, रेशनकार्ड आणि रोजगाराचे प्रश्न, योजनांचा लाभ, आदिवासी वस्त्यांमध्ये पाणी, रस्ते, वीज यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. चौकट कचरा अन् वाहतूक कोंडी आंदोलनामुळे स्वातंत्र्य चौक ते आकाशवाणी चौक या मार्गावरील वाहनधारकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. आंदोलनस्थळी आंदोलकांचा ठिय्या कायम असून, या परिसरातून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे, परिसरात स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी महापालिकेकडून कचरा संकलन करण्यात येत आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीचे नियोजन करणे आवश्यक बनले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com