शबरी नॅचरल्सच्या पॅकेजिंगला जपानचा प्रतिष्ठित ‘जी-मार्क’ पुरस्कार

शबरी नॅचरल्सच्या पॅकेजिंगला जपानचा प्रतिष्ठित ‘जी-मार्क’ पुरस्कार
Published on: 
(पान ४ ला ॲंकर) WRS26B02889 वार्सा : पुरस्कारप्राप्त पॅकेजिंग दाखविताना आदिवासी महिला. ----------- शबरी नॅचरल्सच्या पॅकेजिंगला जपानचा प्रतिष्ठित ‘जी-मार्क’ पुरस्कार आदिवासी संस्कृतीला जागतिक व्यासपीठ; नैसर्गिक उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नवी ओळख सकाळ वृत्तसेवा वार्सा, ता. २६ : महाराष्ट्रातील आदिवासी समाजाची समृद्ध कला, संस्कृती आणि पारंपरिक ज्ञानाला जागतिक स्तरावर मान्यता मिळत असून, राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या ‘शबरी नॅचरल्स’ या ब्रँडच्या उत्पादनांच्या पॅकेजिंगला जपानचा प्रतिष्ठित ‘गुड डिझाइन अवॉर्ड’ (जी-मार्क) पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘वारली’ आणि ‘चित्रकाठी’ या पारंपरिक कलांचा कल्पक वापर करून तयार केलेल्या आकर्षक पॅकेजिंगमुळे आदिवासी संस्कृतीला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाली आहे. ----------- आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांनी उत्पादित केलेल्या विविध नैसर्गिक वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘शबरी नॅचरल्स’ हा ब्रँड विकसित केला आहे. या ब्रँडअंतर्गत आदिवासी महिलांनी संकलित केलेला मध, मोहफुलांपासून तयार केलेली विविध उत्पादने, चारोळी, बांबू उत्पादने तसेच अन्य नैसर्गिक व वनाधारित वस्तूंची विक्री केली जाते. या उत्पादनांच्या पॅकेजिंगमध्ये आदिवासी समाजाची पारंपरिक कला, जीवनशैली, निसर्गाशी असलेले नाते आणि सांस्कृतिक वारसा प्रभावीपणे मांडला आहे. आधुनिक व आकर्षक स्वरूपासोबतच सांस्कृतिक मूल्ये, शाश्वतता आणि नावीन्यपूर्ण सादरीकरण यांचा सुरेख मेळ साधण्यात आल्याने या पॅकेजिंगची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली. या पुरस्कारामुळे आदिवासी बांधवांच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत अधिक संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. उत्पादनांची मागणी वाढल्यास आदिवासी महिलांना रोजगाराच्या नव्या संधी मिळतील, त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि स्थानिक पातळीवरील आर्थिक विकासाला चालना मिळेल. पारंपरिक कला आणि नैसर्गिक उत्पादनांच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या स्वावलंबनाला बळ देणारा हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. जपान इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन प्रमोशनतर्फे दिला जाणारा ‘गुड डिझाइन अवॉर्ड’ हा डिझाइन क्षेत्रातील प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जपानमध्ये या पुरस्काराचे वितरण होणार असल्याचे वृत्त आहे. -------- आदिवासी समाजाच्या पारंपरिक कला, जीवनशैली आणि निसर्गाशी असलेल्या नात्याला आधुनिक बाजारपेठेशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे. शबरी नॅचरल्सच्या पॅकेजिंगला मिळालेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार हा आदिवासी बांधवांच्या कलेचा आणि कौशल्याचा सन्मान आहे. या यशामुळे आदिवासी महिलांच्या उत्पादनांना अधिक व्यापक बाजारपेठ मिळण्यास मदत होईल. - लीना बनसोड, आयुक्त, आदिवासी विकास विभाग --------- शबरी नॅचरल्सच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेला सन्मान हा आदिवासी बांधवांच्या पारंपरिक कौशल्याचा गौरव आहे. या उपक्रमामुळे आदिवासी उत्पादकांना त्यांच्या उत्पादनांसाठी नवी बाजारपेठ उपलब्ध होईल. उत्पादनांची मागणी वाढून आदिवासी बांधवांच्या रोजगारनिर्मितीला आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल. आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. - प्रा. अशोक उईके, आदिवासी विकासमंत्री, महाराष्ट्र राज्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com