नाशिक- त्र्यंबकेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी २४१ कोटींच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला राज्याच्या उच्चाधिकार समितीने तत्त्वत: मान्यता दिली आहे. समितीने काही बदल सुचविताना दोन दिवसांत परिपूर्ण आराखडा सादर करण्याचे निर्देश गुरुवारी (ता. २४) त्र्यंबकेश्वर पालिकेला दिले.