Nashik Crime : त्र्यंबक नाका परिसरात मध्यरात्री थरार! तृतीयपंथीय व तरुणांमध्ये कोयत्याने हाणामारी

Midnight Brawl at Trimbak Naka: Four Involved : मध्यरात्रीच्या सुमारास दोन तृतीयपंथी आणि दोन तरुणांमध्ये जोरदार मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली. या हाणामारीत कोयता आणि दगडांचा वापर करण्यात आला.
Crime
Crimesakal
Updated on

जुने नाशिक: शहरातील त्र्यंबक नाका सिग्नल परिसरात गुरुवारी (ता. २४) मध्यरात्रीच्या सुमारास दोन तृतीयपंथी आणि दोन तरुणांमध्ये जोरदार मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली. या हाणामारीत कोयता आणि दगडांचा वापर करण्यात आला. घटनेमुळे परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहविक्री व्यवसायाच्या आर्थिक वादातून घटना घडल्याची परिसरात चर्चा सुरू होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com