Trimbak Road
sakal
नाशिक: गेल्या महिनाभरापासून त्र्यंबक रोडवर जलतरण तलाव सिग्नल ते सिबल हॉटेल सिग्नलदरम्यान नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी करण्यात आलेल्या रस्ता खोदकामामुळे संपूर्ण रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. वाहनचालकांना धुळीकणांमुळे मनस्तापाला सामोरे जावे लागते. विशेषतः दुचाकी, रिक्षाचालकांना जिकिरीने वाहने चालवावी लागतात. या खोदकामामुळे त्र्यंबक रोडची वाताहत झाली आहे.