त्र्यंबकेश्‍वर शहरात पाणीबाणी

त्र्यंबकेश्‍वर शहरात पाणीबाणी
Published on: 
पान ३ -------------- नियोजनशून्य कारभाराने त्र्यंबकमध्ये पाणीबाणी कमी दाबाने, अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक हैराण, आंदोलनाचा इशारा सकाळ वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर, ता.१६ : त्र्यंबकेश्वरमध्ये सध्या कमी दाबाने पाणी येत असल्यामुळे नागरिक मेटाकुटीस आले आहेत. विविध कारणांमुळे शहरात नियमित व जास्त दाबाने पाणी पुरवठा होत नसल्यामुळे नागरिक मेटाकुटीला आले असून त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्‍वभूमीवर शहरासाठी नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. सिंहस्थापूर्वी हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा असली तरी सध्या शहरात पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. अनेकदा विविध भागात पाणी पुरवठा होत नाही. पिण्याच्या पाण्यासह वापराचे पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांना सार्वजनिक विहिरींवरून पाणी आणावे लागते. रस्त्याची कामे सुरु असल्याने त्यातून मार्गक्रमण करताना अडचण होते. दगड,माती वाहतूक सतत सुरु असल्याने धुळीचे साम्राज्य पसरले आहे. नागरिकांना याचा त्रास होत असून आजारांमध्ये वाढ झाली आहे. विद्युत सेवा सातत्याने खंडीत होत असल्याने त्याचाही त्रास सर्वांना होतो. या संदर्भातील तक्रारी थेट नगराध्यक्षांकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने नागरिकांचे प्रश्‍न सोडवण्याचे आदेश दिले. कुंभमेळ्याच्या नावाखाली नागरिकांना गैरसोयीच सामना करावा लागत असला तरी यातून मार्ग काढण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. ... कोट नळांना पाणी येण्याची निश्चित वेळ माहीत नसल्यामुळे पाणी केव्हा येणार हे सांगता येत नाही. पिण्याच्या पाण्यासह वापरासाठी तलावातील अशुद्ध घाणीचे पाणी दूरवरून आणावे लागत आहे. -आशा ठमके , गृहिणी … पाणी पुरवठ्या संदर्भातील तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याची तातडीने सोडवणूक करण्याचे आदेश नगरपालिकेला दिले आहे. लवकरच पाणी पुरवठा सुरळीत होईल. -त्रिवेणी तुंगार, नगराध्यक्ष (त्र्यंबकेश्‍वर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com