त्र्यंबकेश्वर: ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी विविध खात्यातर्फे नियोजन करण्यात आले असून चारही दिशांनी येणाऱ्या वाहनांची तात्पुरत्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तिसऱ्या सोमवारी (ता.११) ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी सुमारे दोन लाख भाविक येतील या अंदाजाने नियोजन करण्यात आले आहे.