मुख्याधिकारी गोविंद जाधव, त्र्यंबकेश्‍वर नगरपालिका

मुख्याधिकारी गोविंद जाधव, त्र्यंबकेश्‍वर नगरपालिका
Published on: 
ध्वजारोहण सोहळा विशेष पुरवणी ... त्र्यंबकेश्‍वरचा कायापालट घडविणारा सिंहस्थ लीड अनेक दिवसांपासून प्रलंबित शहरातील कचरा डेपो स्थलांतरित करण्याचा विषय त्र्यंबकेश्‍वर पालिका व कुंभमेळा प्राधिकरणाने प्रथमतः मार्गी लावला. दुर्गंधीमुक्त शहर संकल्पना प्रत्यक्षात उतरल्यानंतर शहराच्या सुशोभीकरणासह भाविकांना दर्शन सुलभ होण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत. पेगलवाडी येथे नवीन ४.२ किलोमीटरच्या घाटांची निर्मिती करण्यात येत असून, त्यातून कुशावर्त तीर्थावर होणाऱ्या गर्दीचे नियोजन करणे शक्य होणार आहे. नवीन घाटांमुळे शहर विकासाला नवीन वळण मिळाले आहे. दर्शन पथाच्या कामासाठी पालिकेने अतिक्रमण निर्मूलन मोहीम मोठ्या प्रमाणात राबविली. त्र्यंबकराज मंदिर परिसर मोकळा झाल्यामुळे दर्शनपथाच्या कामांना गती मिळत आहे. -गोविंद जाधव, मुख्याधिकारी, त्र्यंबकेश्‍वर पालिका -- नाशिक ते त्र्यंबकेश्‍वर रस्ता पूर्णतः सिमेंटचा बनविण्यात येत आहे. शहरातील प्रस्तावित रिंग रोड, नवीन पाणीपुरवठा योजना, घनकचरा व्यवस्थापन, कुशावर्त तीर्थाचा ‘सीएसआर’च्या माध्यमातून विकास, शहरातील सात तलावांचा विकास आणि प्राचीन मंदिरांचे संवर्धन या स्वरूपाची प्रमुख कामे प्रगतिपथावर आहेत. त्र्यंबकेश्‍वर शहराची एकूण लोकसंख्या २५ हजार आहे. मात्र, नियमितपणे येणाऱ्या भाविकांचे प्रमाण २५ हजारांवर असल्यामुळे त्यांना मूलभूत सुविधा पुरविताना पालिकेला मर्यादा येतात. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने या अडचणी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्र्यंबकेश्‍वर पालिकेची इमारत अत्यंत प्राचीन आहे. शहराचा वाढता विस्तार बघता एवढ्या जागेतून कामकाज चालविणे अडचणीचे ठरते. त्यावर अंतिम तोडगा निघाला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्र्यंबकेश्‍वर येथे नवीन इमारतीची नुकतीच घोषणा केली. सध्या अस्तित्वात असलेली इमारत पाडून त्याच ठिकाणी नवीन भव्य इमारत उभारण्याचे नियोजन आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नवीन योजनेचे काम सुरू असल्यामुळे भविष्यातील वाढती लोकसंख्या व भाविकांची संख्या विचारात घेऊन ही योजना आखली आहे. --- कामे झपाट्याने सुरू बेझे येथील धरणातून पाणी त्र्यंबकेश्‍वरपर्यंत आणण्यात येईल. नीलगिरी पर्वतालगत असलेल्या पाण्याच्या टाकीपासून त्यांचे विभाजन करण्यात येणार आहे. विभाजनापासून पालिकेचा सहभाग राहील. पण पाणीपुरवठा होणे ही शहराच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. त्र्यंबकराजाच्या दर्शनानिमित्त येणाऱ्या प्रत्येक भाविकाला हे शहर स्वच्छ आणि सुंदर दिसले पाहिजे. त्यासाठी प्लॅस्टिकमुक्त शहर ही संकल्पना लवकरच राबविणार आहोत. जगभरातील कोट्यवधी भाविकांचे लक्ष लागून असलेला सिंहस्थ कुंभमेळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी त्र्यंबकेश्‍वर शहरात आवश्‍यक त्या सुविधा पुरविण्याचे नियोजन सुरू आहे. महसूल प्रशासन, पोलिस अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, पुरोहित संघ, आखाड्यांचे साधु-महंत यांच्या सहकार्यातून या शहरातील कामे झपाट्याने सुरू आहेत. … महत्त्वाची कामे (कोटीत) -८९.८१ : काँक्रीट रस्ते, पर्जन्य जलवाहिन्या, विद्युत डक -६४.२१: पाणीपुरवठा योजना -११.०३ : घनकचरा व्यवस्थापन - ३६.९२ : कुशावर्त तीर्थ विकास, गौतमी तलाव व मंदिर संवर्धन -३२८ : उपसा जलसिंचन योजना -२५० : दर्शन पथ व नवीन रस्ता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com