त्र्यंबकेश्वर येथील दसरा पूजन

त्र्यंबकेश्वर येथील दसरा पूजन
Published on: 
मुख्य अंक पान ३ साठी ----------- NSK२६H३३१५४ त्र्यंबकेश्वर ः दसऱ्यानिमित्त मंगळवारी सीमोल्लंघनास निघालेली श्री त्र्यंबकेश्वराची पालखी. समवेत विश्वस्त व अधिकारी, कर्मचारी व भाविक. (छायाचित्र ः कमलाकर अकोलकर) --------------- NSK२६H३३१५५ त्र्यंबकेश्वर ः शमी वृक्षाची पूजा करताना विश्वस्त मंडळ -------- NSK२६H३३१५६ त्र्यंबकेश्वर ः मानाची अब्दागिरी आणणारे हरसूल येथील पती पत्नी. ------------------- ३६-४ त्र्यंबकेश्वरला पारंपारिक उत्साहात दसरा कोठीहॉल येथे शस्रपूजन ः पालखीवेळी पावसाच्या हलक्या सरी ----------- सकाळ वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर, ता.२० ः दसऱ्यानिमित्त येथे मंगळवारी श्री. त्र्यंबकेश्वराच्या मुखवट्यांची पालखीतून सीमोल्लघनासाठी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर विश्वस्त मंडळातर्फे शमी वृक्षाची पूजा करण्यात आली. तत्पूर्वी त्र्यंबकेश्वर मंदिरात विश्वस्तांनी मंदिरात महापूजा केली. पारंपरिक उत्साहात दसरा सण साजरा करण्यात आला. पालखी सीमोल्लंघनास निघताच हलक्या पावसाच्या सरी कोसळत होत्या. ---------------- नवमी व दसरा एकाच दिवशी आल्याने उपवासाचे पारणे व दसरा सण असे दुहेरी योग आल्याने भाविकांची तारांबळ उडाली होती. येथील प्रसिद्ध नवदुर्गा मंदिरे भाविकांनी फुलून गेली होती. सकाळपासूनच झेंडूची फुले व माळा खरेदीसाठी झुंबड उडाली होती. सकाळी श्री त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात विश्वस्तांनी महापूजा केली. कोठीहालमध्ये जुन्या शस्त्रांची पूजा करण्यात आली. दुपारी चारला कोठीहॉलमध्ये त्र्यंबकेश्वराच्या पंचमुखी सुवर्ण मुखवट्यांची पूजा विश्वस्त सत्यप्रिय शुक्ल, मनोज थेटे, प्रदीप तुंगार यांनी केली. हा मुखवटा सजविलेल्या पालखीत विराजमान करत पालखी सीमोल्लंघनास निघाली. यावेळी हरसूल गावचे दोरे कुटुंबीय अब्दागिरी घेऊन सहभागी झाले होते. पालखी कुशावर्त तीर्थावरून मेनरोडने शहराबाहेर सीमोल्लंघनासाठी धारणे यांनी दिलेल्या जागेत पोचल्यावर तेथे शमीवृक्षाची पूजा विश्वस्त मंडळाच्या हातून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित भाविकांनी शमी वृक्षाची पाने सोने म्हणून लुटले. तेथे भाविकांना दूध व पेढे देण्यात आले. पालखी परतताना जव्हार रस्त्याने महादेवी मंदिरात नेण्यात आली. तेथील विश्वस्तांनी स्वागत व पूजा केली. पालखी परत मंदिरात आल्यावर भाविक व स्थानिकांची दर्शनासाठी गर्दी सुरु‌ झाली होती. -----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com