NSK26H33330
सापतपाली (ता. त्र्यंबकेश्वर) : येथील शेतकरी अशोक कनोजे यांना विहिरीच्या लाभाचे वाटप करताना रविकांत सानप, महेश नागपूरकर.
-------------
३६-२
शेतकऱ्यांच्या बांधावर
जाऊन योजनेचा लाभ
त्र्यंबकेश्वर पंचायत समितीतर्फे ‘सेवा संकल्प’ अभियान
सकाळ वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर, ता. २३ : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या माध्यमातून ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत ‘एक दिवा आशिर्वादाचा’ या उपक्रमांतर्गत अनुसुचित जमातीसाठी राबविण्यात येणाऱ्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा लाभ सापतपाली (ता. त्र्यंबकेश्वर) येथील लाभार्थी शेतकरी अशोक कनोजे यांच्या शेतावर जाऊन देण्यात आला.
गटविकास अधिकारी रविकांत सानप, कृषी अधिकारी महेश नागपूरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी किशोर देसले यांच्या हस्ते अशोक कनोजे या शेतकऱ्यास बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत नवीन विहिर या घटकाचा लाभ देण्यात आला. शासनाच्या महिला सक्षमीकरण धोरणाला अनुसरुन सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून महिला सशक्तीकरण होण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम कृषी विभागामार्फत महिला राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
शेतीतील उत्साह वाढविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य कृषी विभागाच्या माध्यमातून घडले. विहिरीच्या लाभामुळे कायमस्वरुपी पाण्याचा साठा उपलब्ध झाल्यामुळे आमचा शेती करण्याचा उत्साह वाढला असून, यापुढे कोरडवाहू शेती न करता आंबा फळबाग लागवड करण्याचा मानस श्री. कनोजे यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, कृषी विकास अधिकारी वरुण पाटील, गटविकास अधिकारी रविकांत सानप यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना विविध योजनेची माहिती देण्यात येत आहे.