राष्ट्रपतींच्या हस्ते गोदापूजन, मुख्यमंत्र्यांकडून ध्वजारोहण

राष्ट्रपतींच्या हस्ते गोदापूजन, मुख्यमंत्र्यांकडून ध्वजारोहण
Published on: 
पान-१--साठी -------------- त्र्यंबकेश्‍वरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण, राष्ट्रपतींकडून गंगापूजन -------------- त्र्यंबकेश्वर : येथील सिंहस्थ कुंभमेळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शृंगेरी पिठाचे शंकराचार्य विधुशेखर भारती यांच्या हस्ते येथे शनिवारी (ता.३१) सकाळी तीर्थराज कुशावर्तावर मंगलमय वातावरणात ध्वजारोहण सोहळा झाला अन कुंभमेळ्याचा मंगल पर्वाला सुरवात झाली. दुपारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कुशावर्त येथे गोदावरी तीर्थपूजन केले. त्यानंतर त्र्यंबकेश्‍वर मंदिरात पूजा करत त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. आजवरच्या इतिहासात प्रथमच ध्वजारोहण सोहळ्यास राष्ट्रपतींची उपस्थिती लाभल्याने हा संस्मरणीय ठरला आहे. --------------- तीर्थराज कुशावर्ताला झेंडूच्या फुलांच्या माळा व आकर्षक रोषणाईने सजविण्यात आले होते. तीर्थराज कुशावर्तावर दुपारी ठिक १२ वाजून २ मिनिटांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर पेगलवाडी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ४.२ किलो मीटरच्या घाटांवरील ध्वजारोहण सोहळ्यास त्यांनी हजेरी लावली. शैव आखाड्यांच्या साधू- महंतांसह येथे त्यांनी ध्वजपूजन केले. साधारणतः एक ते दीड वाजेपर्यंत हा सोहळा रंगला. मुख्यमंत्र्यांनी साधू- महंतांसोबत भोजनाचा आस्वाद घेतला. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांचे पुणेरी पगडी व शाल देऊन स्वागत करण्यात आले. कुशावर्त तीर्थावर ध्वज स्तंभांलगत धर्म, श्रध्दा, सनातन संस्कृतीचे प्रतीक असलेल्या त्रिकोणी सिंहस्थ ध्वजाची पूजा करण्यात आली. यात गणेश पूजन, पुण्याहवाचन करून दोघांनी ध्वजपूजा केली. १६-१ राष्ट्रपतींकडून त्र्यंबकेश्वराची पूजा या सोहळ्यानंतर दुपारी तीनला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे त्र्यंबकेश्‍वरमधे आगमन झाले. तीर्थराज कुशावर्त येथे त्यांनी १२ मिनिटे गोदावरी पूजन केले. त्यानंतर देशातील बारा ज्योर्तिलिंगामधे स्थान असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील त्र्यंबकराज मंदिरात त्यांनी दर्शन घेतले. पुरोहित संघाचे उपाध्यक्ष गिरीश जोशी यांनी त्यांचे पौराहित्य केले. साधारणतः १५ मिनिटांची पूजा त्यांनी केली. या सर्व सोहळ्यानिमित्त त्र्यंबकराज मंदिर सर्वसामान्य भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. मंदिराला सुंदर फुलांची आरास तयार करण्यात आली होती. या सर्व सोहळ्यांप्रसंगी राज्यपाल जिष्णूदेव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष हरिगिरी महाराज, कोषाध्यक्ष महंत शंकरानंद सरस्वती, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, मंत्री जयकुमार रावल, आमदार हिरामण खोसकर, दिलीप बनकर, गोकूळ गिते, ॲड. माणिकराव कोकाटे, नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, नगरसेवक व स्थानिक नागरिक उपस्थित होते. … १६-१ ताम्रपत्र, ध्वजपताका भेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांना अखिल भारतीय पुरोहित संघातर्फे ताम्रपत्र व ध्वजपताकांची प्रतिमा भेट देण्यात आली. धर्मध्वज बनविताना वापरण्यात आलेल्या कापडाची ही प्रतिमा तयार करण्यात आली आहे. पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे यांनी राष्ट्रपतींना भेट देताना त्यांचे त्र्यंबकनगरीत आल्याबद्दल आभार मानले. राष्ट्रपतींनी त्यांना उत्तर देताना हा सोहळा बघून आनंद झाल्याचे सांगितले. ----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.