Trimbakeshwar Garbage Issue
sakal
नाशिक: त्र्यंबकेश्वर शहरातील दैनंदिन कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, येत्या १ मार्चपासून त्र्यंबकेश्वरमधील कचरा नाशिक शहरातील विल्होळी येथील डेपोत पाठविण्यात येणार आहे. तळेगाव शिवारात नव्या कचरा डेपोचे काम सुरू असले तरी ते पूर्ण होईपर्यंत ही तात्पुरती व्यवस्था लागू राहणार आहे.