त्र्यंबकेश्वर- येथे संत निवृत्तिनाथांच्या समाधीस चंदनाची उटी गुरुवारी (ता. २२) एकादशीच्या दिवशी लावण्यात येणार असून, भाविक रोज चंदनाचे खोड उगाळून सुगंधी उटी तयार करत आहेत. दरम्यान, या उटीच्या वारीसाठी जिल्हाभरातून दिंड्यांची रणरणत्या उन्हात आगेकूच सुरू असून, बुधवारी सायंकाळपर्यंत या दिंड्या येथे पोचतील.