त्र्यंबकेश्वर- त्र्यंबकेश्वर नगरीत बुधवारी (ता. २) पहाटेपासून धुवाधार पावसाने हजेरी लावल्याने शहरातील मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळ जलमय झाले. मेन रोड, तेली गल्ली परिसरात पहाटेपासूनच पाणी साचले होते. त्यामुळे भाविकांची मोठी गैरसोय झाली. पावसाचे पाणी घरात शिरले, शहरभर चिखल व दुर्गंधी पसरली. मात्र पालिका प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याचे चित्र दिसून आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.