Ayush Prasad
sakal
नाशिक: सिंहस्थ- कुंभमेळ्यापूर्वी नाशिक- त्र्यंबकेश्वर महामार्गाचे सहापदरीकरण केले जाणार आहे. महामार्गाच्या रुंदीकरणासाठी आवश्यक भूसंपादनामुळे स्थानिक रहिवासी व शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी प्रशासन खबरदारी घेत आहे. बाधितांशी चर्चेतूनच सुवर्णमध्य काढण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ‘सकाळ’ शी बोलताना दिली. सर्व शासकीय विभागांच्या समन्वयातून कुंभमेळ्याशी संबंधित कामे वेळेत पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली.