त्र्यंबकेश्वर- बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी देशभरातून रोज भाविक येत असतात. सुटीचा आणि श्रावणात तर येथे तुडुंब गर्दी असते. मात्र एवढ्या प्रमाणावर येणारे भाविक आणि त्यांना दर्शन सुलभ व्हावे, याकडे येथील देवस्थान ट्रस्ट आणि प्रशासनानेही गांभीर्याने लक्ष दिलेले नसल्याने दर्शन व्यवस्थेचा रोज बोजवारा उडत आहे. देशभरातील लहान-मोठ्या देवस्थानांमध्ये दर्शन सुलभ व्हावे, यासाठी सर्वोच्च्य प्राधान्य दिले जात असताना येथे मात्र तसे घडत नसल्याने देवस्थान, ट्रस्टी नेमके करतात काय, असा प्रश्न भाविकांच्या मनात निर्माण होत आहे.