नाशिक: सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर आला असताना महापालिकेकडून अद्याप एकही कामे सुरू झालेली नाहीत. सर्व कामे निविदा प्रक्रियेत अडकल्याने प्रत्यक्षात कामे दिसत नाही. सर्व कामांचा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविण्याच्या सूचना मिळाल्यानंतर आता प्रत्यक्षात सुरू असलेली कामे, निविदा प्रक्रियेतील कामे व सुरू करावयाची कामांची यादी संकलित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.