त्र्यंबकेश्वर: सिंहस्थ कुंभमेळा जवळ येत असतानाही येथील मूलभूत सुविधांबाबत प्रशासन फारसे गंभीर नसल्याचा आरोप करत येथील विविध आखाड्यांच्या साधू-महंतांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांबाबत शासन, प्रशासन गंभीर नसून आता ही परिस्थिती तर सिंहस्थ कुंभमेळ्यात काय स्थिती असेल, असा प्रश्न आखाडाप्रमुखांनी प्रशासनाला केला. त्यावर विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी महंतांनी सुचविलेली कामे प्राधान्याने करण्याचे आश्वासन दिले.