Trimbakeshwar Kumbh Mela
sakal
नाशिक: कुंभमेळा प्राधिकरणाने त्र्यंबकेश्वरमधील आखाड्यांच्या कामांची घोषणा केली. परंतु, प्रत्यक्षात कामांना सुरुवात न झाल्याने अखिल भारतीय आखाडा परिषदेचे पदाधिकारी व येथील आखाड्यांच्या साधू-महंतांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आखाड्यांनी शासनाकडे दिलेल्या प्रस्तावानुसार कामे होणार असतील तरच ही कामे आम्ही होऊ देऊ, अन्यथा त्यावर बहिष्कार टाकण्याचा थेट इशारा दिल्याने साधू-महंत व प्रशासनातील वादाला सुरुवात झाली आहे.