Kumbh Mela
sakal
नाशिक: नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये पुढील वर्षी होणारा सिंहस्थ कुंभमेळा तसेच विविध घाटांच्या सुशोभीकरणासह अन्य विकासकामे निर्विघ्न पार पडावीत, असा संकल्प गुरुवारी (ता. १३) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामतीर्थावरील भूमिपूजन कार्यक्रमात सोडला. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, क्रीडामंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, आमदार ॲड. राहुल ढिकले, देवयानी फरांदे, सीमा हिरे, दिलीप बनकर यांच्यासह शासकीय, मनपा अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.