Nashik Kumbh Mela
sakal
नाशिक: नगर परिषदांनंतर आता महापालिकेची आचारसंहिता लागू झाल्याने सिंहस्थ-कुंभमेळ्याच्या तयारीशी संबंधित विकासकामांना मोठा अडथळा निर्माण झाला आहे. कार्यारंभ आदेश देता येत नसल्याने नाशिक व त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणच्या आखाड्यांतील साधू-महंतांमध्ये नाराजी वाढताना दिसते.