त्र्यंबकेश्‍वरला ध्वजारोहण सोहळ्याचा उत्साह शिगेला

त्र्यंबकेश्‍वरला ध्वजारोहण सोहळ्याचा उत्साह शिगेला
Published on: 
फोटो आहेत. त्र्यंबकेश्वरला ध्वजारोहणाचा उत्साह शिगेला कुशावर्त तीर्थासह शहरात आकर्षक रोषणाई; प्रशासकीय तयारीला वेग सकाळ वृत्तसेवा त्र्यंबकेश्‍वर, ता.२९ : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत शनिवारी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. त्र्यंबकेश्‍वरला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. वाहतूक मार्गातील बदलांसह प्रशासकीय तयारीला वेग आला आहे. ------ त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळा ध्वजारोहण कार्यक्रमावर पावसाचे सावट असल्यामुळे राष्ट्रपतींचा हेलिकॉप्टर प्रवास रद्द करण्यात आला. त्यामुळे नाशिक ते त्र्यंबकेश्‍वरपर्यंत त्या कारने प्रवास करतील. कुशावर्त तीर्थावर दुपारी १२.०२ मिनिटांनी शृंगेरी शारदा पिठाधीश्वर श्री विधुशेखर भारती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, मंत्री छगन भुजबळ, दादा भुसे, डॉ. उदय सामंत, नरहरी झिरवाळ, जयकुमार रावल, शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सुहास कांदे, हिरामण खोसकर उपस्थित राहतील. कार्यक्रमाच्या ठिकाणी निमंत्रित व्यक्तींना प्राधान्य देण्यात येणार आहे. शहरातून शोभायात्रा काढण्यात येणार असून यामध्ये स्थानिक नागरिकांनी पारंपारिक वेशभूषा करून सहभागी व्हावे, असे नगरपालिकेतर्फे दवंडी देण्यात आली आहे. बंदोबस्ताच्या दृष्टीने शहरात मोठ्या प्रमाणावर पोलिस फौजफाटा व अधिकारी तसेच विविध शासकीय अधिकारी दाखल झाले आहेत. शहरभर भगवे ध्वज व जाळ्या, पडदे लावून जय्यत तयारी केल्यामुळे ध्वजारोहण सोहळ्याविषयीची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. … राष्ट्रपती ४५ मिनिटे त्र्यंबकेश्‍वरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या शनिवारी संपूर्ण दिवसभर नाशिकला असतील. दुपारी दोनला त्या त्र्यंबकेश्‍वरला जाणार असून कुशावर्त तीर्थावर १२ मिनिटे गोदावरी पूजन होईल. यानंतर १५ मिनिटे त्र्यंबकराज मंदिरात त्यांच्या हस्ते पूजाविधी होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांसह एकूण ४५ मिनिटे त्या त्र्यंबकेश्‍वरमध्ये राहतील. ------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.