Nashik Kumbh Mela : हिंदुत्ववादी सरकार असूनही उदासीनता का? त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळा निधीवरून महंतांनी उठवला सवाल
Sadhus and Akharas Express Anger Over Delay in Kumbh Mela Preparations : वारंवार घोषणा होऊनही कामे केवळ कागदावरच असल्याने सर्वच साधू-महंतांनी व मठाधिपतींनी येथे झालेल्या बैठकीत शासनाचा एकमुखी निषेध केला. सिंहस्थ कुंभमेळा कालावधीसाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांवरही अविश्वास दर्शवित त्यांना बदलण्यात यावे.
त्र्यंबकेश्वर: सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर असताना येथील एकही कामाला अद्याप सुरवात झालेली नाही. वारंवार घोषणा होऊनही कामे केवळ कागदावरच असल्याने सर्वच साधू-महंतांनी व मठाधिपतींनी येथे झालेल्या बैठकीत शासनाचा एकमुखी निषेध केला.