Trimbakeshwar Mahashivratri : 'बम बम भोले'च्या निनादाने दुमदुमली त्र्यंबकनगरी; महाशिवरात्रीनिमित्त भाविकांचा महापूर!

Massive Devotee Rush at Trimbakeshwar Temple on Mahashivratri : शिवशंकर शंभोचा निनाद करत पहाटेपासून भाविक, साधूगणांनी दर्शन आणि कुशावर्तावर स्नानासाठी गर्दी केली होती. पहाटे चारला मंदिर खुले झाल्यानंतर भाविकांची झुंबड उडाली होती.
Trimbakeshwar Mahashivratri

Trimbakeshwar Mahashivratri

sakal 

Updated on

त्र्यंबकेश्वर: येथे महाशिवरात्रीनिमित्त रविवारी नमामि शंकर, शिवशंकर शंभोचा निनाद करत पहाटेपासून भाविक, साधूगणांनी दर्शन आणि कुशावर्तावर स्नानासाठी गर्दी केली होती. पहाटे चारला मंदिर खुले झाल्यानंतर भाविकांची झुंबड उडाली होती. दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत गेल्याने लांबलचक रांगा लागल्या होत्या. दरम्यान, दुपारी तीनला श्री त्र्यंबकेश्वराच्या पंचधातूच्या मुखवट्यांची पालखीतून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. रात्री उशिरापर्यंत भाविकांच्या रांगा कायम होत्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com