Municipal Election
sakal
नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने भाजपने अत्यंत प्रतिष्ठेच्या बनविलेल्या त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या त्रिवेणी तुंगार यांनी नगराध्यक्षपदी बाजी मारत पालिकेच्या इतिहासात प्रथमच शिवसेनेचा भगवा फडकविला आहे. भाजपचे उमेदवार कैलास घुले यांना ८६८ मतांनी पराभवाची धूळ त्यांनी चारली. तसेच नगरसेवकांच्या एकूण २० जागांमध्ये राष्ट्रवादीचे सात, भाजपचे सहा, शिवसेनेचे पाच, तर दोन अपक्षांनी मारली बाजी.