पान ३
----------------
NSK26H32963---NSK26H32964
त्र्यंबकेश्वर ः येथे नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी झालेल्या बैठकीस उपस्थित तहसीलदार गणेश जाधव, नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार यांच्यासह साधूमहंत. समोर उपस्थित नागरिक.
---------------
नागरिकांच्या प्रश्नांनी गाजली नगरसभा
---------------
त्र्यंबकेश्वर ः स्नानासाठी पर्यायी मार्गाचा विचार करण्याचे आखाड्यांचे आश्वासन
-------------
सकाळ वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर, ता. १८ ः येथे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शनिवारी नगरसभा घेण्यात आली. यात गोदाघाटासाठी जमिन घेतलेल्या व्यावसायिकांसह शेतकरींनी आक्रोश केला.
बैठकीला कुंभमेळा आयुक्त शेखरसिंह तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपस्थित राहणार होते. प्रत्यक्षात तहसीलदार जाधव, नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, उपनगराध्यक्षा शिरसाठ, गटनेते प्रशांत गायधनी, सत्यप्रिय शुक्ल यांच्यासह बडा उदासीन आखाड्याचे श्रीमहंत दुर्गादास जी, इतर आखाड्याचे साधुसंत, स्थानिक नागरिक उपस्थित होते.
स्थानिक व्यावसायिकांची दुकाने तोडून सात महिने झाले आहेत, अद्याप त्यांच्या चरितार्थाबाबत कोणतीही सहानुभूती नाही. शेतकरी, व्यावसायिकांच्या जागा घेऊन त्यांना अल्प मोबदला दिला जातो आहे. अशा विविध विषयांवर गरम चर्चा झाली. कुंभमेळा हा लोकांचा सहभाग असल्याशिवाय होऊ शकत नाही. त्यांच्याच घरांवर व व्यवसायावर नांगर फिरवला तर काय करायचे असाही संतप्त प्रश्न उपस्थित करण्यात आला.
लोकांचे नुकसान न करता उपाययोजना करायला हव्यात असे आनंद आखाड्याचे महंत शंकरानंद सरस्वती यांनी स्पष्ट केले. श्री महंत दुर्गादासजी यांनी रहिवाशांना त्रास होत असेल तर शाही स्नानासाठी पर्यायी रस्त्याचा विचार आखाड्यांद्वारा केला जाईल असे आश्वासित केले. तहसीलदार गणेश जाधव पाटील यांनी सगळ्यांच्या सहभागातून हा धार्मिक सोहळा होत आहे. आपल्या समस्या व तक्रारी वरिष्ठ अधिकारींपर्यंत पोहचवण्यात येतील असे स्पष्ट केले. दुपारी चार ते आठपर्यंत मोठी चर्चा घडूनही निष्कर्ष काही निघाला नसल्याने उपस्थितांची नाराजी व्यक्त होत होती.
---------------------