Sant Nivruttinath Maharaj Yatra
sakal
त्र्यंबकेश्वर: संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांची यात्रा बुधवारी (ता.१४) पौष वद्य एकादशीस होत असून, सोमवारी सकाळपासूनच वारकरी भाविकांच्या दिंड्यांनी त्र्यंबकेश्वर नगरीत मोठी गर्दी केली आहे. सायंकाळपर्यंत तब्बल ११० लहान-मोठ्या दिंड्या शहरात दाखल झाल्या असून, यात्रेचे वातावरण भक्तिरसाने भारून गेले आहे.