Trimbakeshwar Online Puja: त्र्यंबकेश्वराच्या 'ऑनलाइन पूजे'च्या नावाखाली लूट, स्थानिक पुरोहितांचे गंभीर आरोप; अशी व्यवस्थाच नाही, ट्रस्टचे म्हणणे

Priests Raise Concerns Over Online Puja Services: त्र्यंबकेश्वर मंदिरातील ‘ऑनलाइन पूजा’च्या नावाखाली भाविकांकडून पैसे घेतल्याचा स्थानिक पुरोहितांचा आरोप आहे. मात्र, अशा ऑनलाइन पूजा ट्रस्टकडून केल्या जात नसल्याचे देवस्थान ट्रस्टने स्पष्ट केले आहे.
Trimbakeshwar Online Puja

Trimbakeshwar Online Puja

esakal

Updated on

त्र्यंबकेश्वर: त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असताना आता विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून 'ऑनलाइन पूजे'च्या नावाखाली पैसे कमावण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप स्थानिक पुरोहितांनी केला आहे. मंदिर परिसर व पिंडीचे चित्रीकरण करून अभिषेक, बेलपत्र अर्पण, जलाभिषेक, कालसर्प पूजा आदी विधी भाविकांच्या नावाने घरबसल्या केल्याचे दर्शविले जात असल्याने स्थानिक पुरोहितांच्या पारंपरिक व्यवसायावर परिणाम होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com