Prayag Tirth Project
sakal
नाशिक
Trimbakeshwar Prayag Tirth Project : त्र्यंबकेश्वरचा कायापालट! १४८ कोटींचा 'प्रयागतीर्थ विकास' प्रकल्प; ५७ लाख भाविकांना घेता येणार शाही स्नान
Prayag Tirth Declared as Official Kumbh Site : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही तफावत दूर करण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण व प्रशासनाने ‘प्रयागतीर्थ क्षेत्र विकास’ प्रकल्प हाती घेतला.
किरण कवडे- नाशिक: कुंभमेळ्याचे मुख्य धार्मिक केंद्र म्हणून त्र्यंबकेश्वरची ओळख असली, तरी भाविकांची संख्या तुलनेने नाशिकपेक्षा कमी राहिल्याने शहराचा अपेक्षित विस्तार आणि विकास आजवर मर्यादितच राहिला आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही तफावत दूर करण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण व प्रशासनाने ‘प्रयागतीर्थ क्षेत्र विकास’ प्रकल्प हाती घेतला. या निर्णयामुळे त्र्यंबकेश्वर शहराच्या विकासाला नवे दालन खुले होणार असल्याचे प्रशासनाचे मत आहे.
