Nashik Trimbakeshwar Road
sakal
नाशिक: त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील बेकायदेशीर बांधकामे पाडण्याच्या निर्णयावर ‘एनएमआरडीए’ ठाम असून, त्यांनी बुधवार (ता. १५)पासून कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीपर्यंत राहत्या घरांना अभय देण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त जलज शर्मा यांनी शिष्टमंडळाला दिले. त्यामुळे या कारवाईवरून संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.