त्र्यंबकेश्वर- श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतीय भाविकांची त्र्यंबकेश्वरमध्ये मोठी गर्दी होत असताना, मंदिर परिसरात सुरक्षारक्षकांनी केलेल्या धक्काबुक्कीमुळे तणावाची स्थिती निर्माण झाली. सहा ते सात तास दर्शनासाठी रांगेत उभे राहिल्यामुळे भाविकांमध्ये शाब्दिक चकमकी झाल्या. त्यामुळे दर्शन व्यवस्था अधिक सुलभ करण्याची मागणी भाविकांकडून जोर धरू लागली आहे.