त्र्यंबकेश्वर: श्रावणातील पहिल्या सोमवारनिमित्त श्री त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी झाली होती. दिवसभर थोड्या थोड्या अंतराने येणारी पावसाची जोरदार सर अन् ‘बम बम भोले’चा घुमणारा जयजयकार अशा भावपूर्ण वातावरणाने त्र्यंबकेश्वर मंदिराचा परिसर गजबजून गेला होता. तत्पूर्वी भाविकांनी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा पूर्ण केली.